0




अन्नपूर्णा भोजनालय



संस्थेने १९७५ साली अन्नपूर्णा भोजनालय सुरु केले, शहरामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्याने वास्तव्य करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती स्वरूपाच्या शुद्ध, सात्विक भोजनाची सोय माफक दरात व्हावी हा उद्देश.

येथे भोजनासाठी असलेल्या प्रशस्त हॉलमध्ये एकाच वेळी ५० व्यक्ती भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच जेवणाच्या पदार्थांची पार्सल सुविधाही आहे. १५-२० जणांची आधी ऑर्डर दिली असल्यास त्यांच्या आवडीप्रमाणे पदार्थ तयार करून दिले जातात.

भोजनालयाच्या स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. ग्राहकांसाठी खास टी. व्ही. ची तसेच उन्हाळ्यात कुलरची व्यवस्था केलेली आहे. होळी, पोळा या सारख्या सणांना ग्राहकांसाठी पुरण - पार्सल तयार असते.

अन्नपूर्णा भोजनालय सोमवार ते शनिवार सकाळी १० ते ३ व संध्याकाळी ७ ते ९ सुरु असते.


१ जुलै २०१८ पासून खास ग्राहकांच्या आग्रहाखातर दर रविवारी सकाळी ११ ते ३ सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर रविवारचा स्पेशल मेनू आधीच भोजनालयात तसेच फेसबुकवर जाहीर केला जातो.











All Rights Reserved © Sharda Udyog Mandir
Designed By Pawgi Infotech Services