0





कर्मचारी महिला व विद्यार्थीनींसाठी वसतिगृह


शारदा उद्योग मंदिर या संस्थेने १९७७ मध्ये कर्मचारी महिलांसाठी वसतिगृह सुरु केले. नोकरीमुळे घरापासून दूर राहावं लागणाऱ्या स्त्रियांनां घरासारखं वाटेल असं; ना नफा ना तोटा या तत्वावर सगळ्या सुविधा देणारं एक वसतिगृह; संस्थेनी सुरु केलं. पुढे त्यात विद्यार्थीनींसाठी सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात आल्या.

आज या वसतिगृहात एकूण १५ कर्मचारी महिलांना आणि २५ विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहाच्या खोल्या भरपूर प्रकाश असलेल्या व हवेशीर आहेत. वेळोवेळी वसतिगृहात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

सध्या कर्मचारी महिलांसाठी असणाऱ्या खोल्यांना लॅट्रिन बाथरूम अटॅच आहेत.
तसेच सगळ्यांना कॉमन असे किचन देण्यात आले आहे. इथे राहणाऱ्यांसाठी सोलर हिटर सिस्टीम लावून गरम पाण्याची सोय केलेली आहे.

वसतिगृहात स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. ही संस्था वसतिगृहातील महिला व विद्यार्थिनींच्या करमणुकीची सुद्धा काळजी घेते. त्यासाठी केबल कनेक्शन असलेला टी. व्ही., कॅरम व बुद्धिबळाचा पट कॉमन हॉलमध्ये ठेवण्यात आला आहे.

वसतिगृहात पूर्णवेळ मेट्रन आहेत ज्या महिला व विद्यार्थिनींच्या सोयी-सुविधांकडे, त्यांना काय हवं नको याकडे लक्ष देतात. रात्रीसाठी सुरक्षा रक्षक सुद्धा आहेत.

वसतिगृहाच्या प्रभारी कार्यकारिणी सदस्य दर महिन्यात एकदा महिला व विद्यार्थिनींसोबत सभा घेतात व अडचणी जाणून घेतात. संस्थेच्या अध्यक्ष जातीने त्यात लक्ष घालतात व त्या तत्परतेने सोडवतात.





All Rights Reserved © Sharda Udyog Mandir
Designed By Pawgi Infotech Services