0





उत्पादन व विक्री केंद्र


१९५० साली शारदा उद्योग मंदीर या संस्थेने सुरु केलेला हा पहिला उपक्रम. पेपरमिंटच्या गोळ्यांचे उत्पादन करून त्या विकणे अशी सुरवात झाली होती. आज या उत्पादन केंद्राचा विस्तार झाला आहे. अनेक पदार्थांचे इथे उत्पादन होते व विक्री केंद्रात त्यांची विक्रीही केली जाते. त्यात प्रामुख्याने हळद, तिखट, काळा मसाला, सुपारी, विविध प्रकारच्या चटण्या तसेच कुरडया, पापड्या, शेवया, सांडगे, अनेक प्रकारचे पापड दहीमिरची ही वाळवणं मोठ्या प्रमाणात उत्पादित करून विकली जातात. चकली, चिवडा, शेव, लाडू, वड्या, करंजी, अनारसे, शंकरपाळे,चिरोटे, बेसनलाडू इ. पदार्थ रोज ताजे बनतात व बारा महिने उपलब्ध असतात. आंब्याचे, मिरचीचे, लिंबाचे, सिझन असेल तर करवंदाचे, आवळ्याचे इ.चवदार लोणचीही विक्री केंद्रात उपलब्ध असतात. कोथिंबीर वड्या हे तर शारदा उद्योग मंदीरचे खास आकर्षण आहे.

खास सणावारांच्या दृष्टीने त्या त्या सणांची गरज लक्षात घेऊन विविध पदार्थ व वस्तू उपलब्ध असतात; जसे संक्रांतीला हलव्याचे दागिने, तिळाच्या वड्या, तीळ गूळ, महालक्ष्मीच्या वेळी फुलोऱ्यातील पदार्थ, गणपतीच्या वेळी मोदक, दिवाळीचा फराळ असे पदार्थ वेळोवेळी उपलब्ध असतात. लग्न प्रसंगात रुखवतासाठी लागणारे अनेक प्रकारही विक्री केंद्रात असतात. जसे रुखवताचे लाडू, अनारसे, चकली, करंज्या, तिळपिंड; तसेच रुखवतातील अनेक कलाकुसरीच्या वस्तूही विक्री केंद्रात उपलब्ध असतात.

या शिवाय विक्री केंद्रात लहान बाळांचे लोकरी कपडे, तयार बाळंतविडेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणाचा विचार करता या वर्षीपासून वेगवेगळ्या कापडी पिशव्याही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विक्रीकेंद्र सोमवार ते शनिवार सकाळी १० ते रात्री ८. ३० पर्यंत सुरु असते.





All Rights Reserved © Sharda Udyog Mandir
Designed By Pawgi Infotech Services