0





२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन


प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आपला प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी संस्थेत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या प्रसंगी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते.
सर्व कार्यकारिणी व कर्मचारी उपस्थित असतात.


११ फेब्रुवारी ताराबाई पाध्ये स्मृती दिन


११ फेब्रुवारी: संस्थेच्या संस्थापिका श्रीमती ताराबाई पाध्ये यांची पुण्यतिथी ११ फेब्रुवारीला साजरी केली जाते,
या दिवशी उत्कृष्ठ कर्मचारी निवड करून त्याचा / तिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची प्रथा यंदापासून सुरु करण्यात येत आहे.


८ मार्च - महिला दिन


संस्थेतर्फे जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. त्या निमित्त कर्मचारी महिलांच्या आरोग्ययासंबंधी,
योगा संबंधी इत्यादी श्रवणीय व उपयुक्त व्याख्यानाचे आयोजन केले जाते.


चैत्राचे हळदीकुंकु


एप्रिल महिन्यात चैत्र गौरीनिमित्त मेळावा आयोजित केला जातो. यात महिलांना गौरीची आरास तसेच इतर सजावटीचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.


१५ ऑगस्ट , स्वातंत्र दिन


आपला राष्ट्रीय सण संस्थेमध्ये मोठ्या उत्साहाने व देशाभिमानाने साजरा केला जातो. या प्रसंगी देखील राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते.
कार्यक्रमाला सर्व कार्यकारिणी व कर्मचारी उपस्थित असतात.


शारदा उत्सव व कोजागिरी


प्रत्येक वर्षी दसऱ्यानंतर तीन दिवसाचा शारदोत्सव साजरा करण्याची जुनी परंपरा आहे त्यासाठी समिती गठीत करून शारदोत्सवाच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे, या हेतूने या आमसभेच्या आयोजन केले जाते. दोन कार्यकारिणी सदस्य, दोन आजीव सभासदांमधून व दोन कर्मचारी अशी सहा जणांची शारदोत्सव समिती स्थापन केली जाते. ही समितीच सभा घेऊन; कोणते कार्यक्रम आयोजित करायचे त्याच्या वेळा, मानधन व कार्यक्रम पत्रिका इत्यादी कामे करते.

शारदोत्सव:
दसऱ्यानंतर शारदा मातेच्या मूर्तीची स्थापना करून तीन दिवस तिची पूजा अर्चा केली जाते. या कार्यक्रमात कर्मचारी, सदस्य व कार्यकारिणी मोठ्या उत्साहाने सहभागी होते. तीन दिवसांच्या या उत्सवात प्रामुख्याने मनोरंजनाचे तसेच उदबोधक असे कार्यक्रम आयोजित केल्या जातात. शेवटच्या दिवशी फराळ व कोजागिरीच्या स्वादिष्ट दुधाने उत्सवाची सांगता होते.

चॅरिटी


१९५० साली शारदा उद्योग मंदीर या संस्थेने सुरु केलेला हा पहिला उपक्रम. पेपरमिंटच्या गोळ्यांचे उत्पादन करून त्या विकणे अशी सुरवात झाली होती. आज या उत्पादन केंद्राचा विस्तार झाला आहे. अनेक पदार्थांचे इथे उत्पादन होते व विक्री केंद्रात त्यांची विक्रीही केली जाते. त्यात प्रामुख्याने हळद, तिखट, काळा मसाला, सुपारी, विविध प्रकारच्या चटण्या तसेच कुरडया, पापड्या, शेवया, सांडगे, अनेक प्रकारचे पापड दहीमिरची ही वाळवणं मोठ्या प्रमाणात उत्पादित करून विकली जातात. चकली, चिवडा, शेव, लाडू, वड्या, करंजी, अनारसे, शंकरपाळे,चिरोटे, बेसनलाडू इ. पदार्थ रोज ताजे बनतात व बारा महिने उपलब्ध असतात.





All Rights Reserved © Sharda Udyog Mandir
Designed By Pawgi Infotech Services